Bhosari : सामायिक भिंतीच्या वादातून तरुणाचे फोडले डोके

एमपीसी न्यूज – सामायिक भिंतीच्या पैशांच्या वादातून चौघांनी एका तरुणाच्या डोक्यात मातीची वीट मारली. यामध्ये तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना गुरुवारी (दि. 14) थोरवे चाळ, दापोडी येथे घडली.

सतीश वसंत उबाळे (वय 29, रा. थोरवे चाळ, दापोडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विजय चंद्रकांत पवार, सचिन चंद्रकांत पवार, कुसुम चंद्रकांत पवार आणि विजय याची पत्नी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरवे चाळ दापोडी येथे अत्तार वीटभट्टीजवळ सतीश यांचे घर आहे. सतीश आणि आरोपी यांच्या घराच्या मध्यभागी एक सामायिक भिंत आहे. त्या भिंतीच्या पैशाच्या कारणावरून गुरुवारी दुपारी सतीश आणि आरोपी यांच्यामध्ये वाद झाला.

यामध्ये आरोपींनी सतीश यांच्या डोक्यात मातीची वीट मारली. यात सतीश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याबाबत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.