Bhosari : मुलीच्या मित्रांकडून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – घरात सर्वजण गप्पा मारत बसले असताना अचानक मुलीचे मित्र आले. त्यांनी मुलीच्या आईला शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 12) रात्री आठच्या सुमारास आदर्षनगर, भोसरी येथे घडली.

कुमार दहिवाल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री फिर्यादी महिलेच्या घरचे सर्वजण घरात गप्पा मारत बसले होते. रात्री आठच्या सुमारास लाईट गेली. त्यावेळी महिलेच्या मुलीचा मित्र आणि त्याचा मित्र असे दोघेजण महिलेच्या घरासमोर आले. त्यांनी महिलेला शिवीगाळ केली.

  • त्यामुळे महिला तरुणांना शिवीगाळ करण्याचा जाब विचारण्यासाठी गेल्या. त्यावेळी तरुणांनी महिलेशी अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तसेच आणखी मुलांना घेऊन येऊन तुम्हाला दाखवतो, अशी धमकी देऊन निघून गेला. याबाबत गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.