Bhosari : एलआयसी एजंटकडून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

एमपीसी न्यूज – एलआयसी एजंटने 14 वर्षीय मुलाला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने नेले. रस्त्यात त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच त्याला याबाबत कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. हा प्रकार 15 मे रोजी इंद्रायणीनगर भोसरी येथे घडला. याबाबत 5 जून रोजी गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलाच्या आईने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लक्ष्मण जिजाबा वाडेकर (वय 45, रा. राजगुरूनगर, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लक्ष्मण हा एलआयसी एजंट आहे. पीडित मुलाच्या आईने त्याच्याकडे एलआयसी पॉलिसी काढली आहे. 15 मे रोजी लक्ष्मण महिलेच्या घरी एलआयसीच्या हप्त्याचा धनादेश (चेक) घेण्यासाठी आला. त्याने त्यांच्या अल्पवयीन मुलाची विचारणा केली. त्याचे उंचीच्या मानाने वजन खूप कमी आहे. त्याला डॉ. लोंढे यांच्या रुग्णालयात घेऊन जातो आणि वजन करून आणतो, असे सांगून त्याने पीडित मुलाला त्याच्या कारमधून नेले.

रुग्णालयात जात असताना रस्त्यात एके ठिकाणी कार थांबवून लक्ष्मण याने पीडित मुलाशी अश्लील वर्तन करत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच त्याला याबाबत कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. घरी आल्यानंतर मुलाने हा सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.