Pune News : चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणात शिंदे सरकारचा मोठा निर्णय

एमपीसी न्यूज :  महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपचे नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा विविध संघटनांनी निषेध केला आहे. (Pune News) चंद्रकांत पाटलांवर पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी 11 पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली होती. या निलंबित पोलिसांबाबत शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात त्यांचावर लावण्यात आलेले 307 हे कलम काढून टाकण्यात आले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या 11 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

Nigdi News : निगडी येथील मोफत पोलीस भरती प्रशिक्षण शिबिरास उत्सफूर्त प्रतिसाद

यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, संघटनांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता या पोलिसांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्यात आलं आहे.(Pune News) यात तीन पोलिस अधिकारी व आठ पोलिसांचा समावेश आहे. या प्रकरणात 307 हे कलम काढून टाकले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.