Pune News : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात चिंचेचे झाड कोसळले, रस्ता वाहतूकीसाठी बंद

एमपीसी न्यूज : विलायती चिंचेचे मोठे झाड पुणे रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का चौकामध्ये आज दुपारी 1.40 वा. पडल्याने मालधक्का चौक ते पुणे रेल्वे स्टेशन वाहतूक (Pune News) गेली दीड तास बंद असल्याची माहिती कमलेश चौधरी, प्रभारी अग्निशमन अधिकारी, पुणे महानगरपालिका यांनी दिली आहे.

प्राथमिक माहिती देताना, चौधरी म्हणाले की एक विलायची चिंचेचे झाड पुणे रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का चौकामध्ये आज दुपारी 1.40 वा. पडले असल्याची वर्दी मिळाली. (Pune News) त्यामुळे मी व कसबा अग्निशमन केंद्राचा एक अग्निशमन बंब व एक रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी पोहोचली. झाड खूप मोठे असल्याने मालधक्का चौकाकडून पुणे एस ती स्टॅन्ड व पुणे रेल्वे स्टेशन कडे जाणारा जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

Bhosari News : बसमध्ये चढताना पर्समधून सव्वा दोन लाखांचे गंठण चोरले 

अग्निशमन विभागाचे सहा ते सात कर्मचारी झाडाच्या फांद्या व झाड कापण्याचे काम करत आहेत. पुर्ण झाड कापून झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.