Shankar Jagtap : भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या घरी गाठीभेटी

एमपीसी न्यूज – भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सर्वांना सोबत घेवून संघटनेच्या (Shankar Jagtap) कामकाजाला सुरुवात केली आहे.  जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या घरी गाठीभेटी घेत आहेत. त्यांच्याकडून आशीर्वाद, मार्गदर्शन घेत त्यांना पुन्हा संघटनेत सक्रीय होण्याची विनंती करत आहेत. 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी झोकून देवून काम करण्याचे आवाहन जगताप यांनी केले.

PMPML : डेक्कन जिमखाना ते खारावडे म्हसोबा मंदिर व आळंदी ते चाकण आंबेठाण चौक या मार्गांवर नव्याने पीएमपीएमएल बस सेवा

भाजपचे शहरातील उद्यमनगर, अजमेरा येथील जुने, निष्ठावंत कार्यकर्ते भावेन पाठक यांच्या घरी शहराध्यक्ष जगताप यांनी सोमवारी भेट दिली. प्रदेशचे निमंत्रित सदस्य सदाशिव खाडे, राजु दुर्गे, संजय मंगोडेकर आदी उपस्थित होते. भावेन पाठक यांचे कुटुंबीय भाजपच्या स्थापनेपासून पक्षाचे काम करत आहेत.

त्यांचे वडील भाजपचे काम करत होते. आता भावेन देखील भाजपचे काम करत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यालय (Shankar Jagtap) नव्हते. त्यावेळी खराळवाडीत सर्वात पहिले भाजपचे कार्यालय सुरु झाले होते. या कार्यालयाच्या निर्मितीत पाठक यांचा मोठा वाटा आहे.

नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सर्वांना सोबत घेवून कामकाजाला सुरुवात केली आहे. जुन्या कार्यकर्त्यांना सन्मान, मान, देत आहेत. भाजपला तळातून पुढे आणणा-या, संघर्षाच्या काळात पक्षाचे काम करणा-या लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. पुन्हा पक्षात सक्रिय होण्याचे आवाहन करत आहेत. शहरात आणखी पक्ष बळकट करायचा आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची आहे.

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी झोकून देवून काम करावे. मिशन 2024 यशस्वी करायचे आहे. त्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांना सक्रिय (Shankar Jagtap) होण्याचे आवाहन ते करत आहेत.

या भेटीबाबत भावेन पाठक म्हणाले, शहराध्यक्ष शंकर जगताप हे जुन्या कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत आहेत.  सर्वांना सोबत घेवून त्यांनी कामाला सुरुवात केली आहे.

जुन्या कार्यकर्त्यांना मान, सन्मान देत आहेत. पक्ष संघटनेत पुन्हा सक्रिय होण्याचे आवाहन करत आहेत.  भाजप विचारांच्या लोकांनी देखील सक्रिय व्हावे. मिशन 2024  पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली. सकारात्मक चर्चा झाली. या भेटीमुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये (BJP)  उत्साह आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.