Pimpri: राज्य सरकारच्या विरोधात शहरात भाजपचे ‘मेरा आंगण मेरा रणांगण’ आंदोलन

BJP's 'Mera Angan Mera Ranangan' agitation in the city against the State Government

एमपीसी न्यूज – कोरोनाची परिस्थिती हातळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपचे आज (शुक्रवारी) राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन  सुरु आहे.  पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी पक्ष कार्यालयाच्या आंगणात उभे राहून आंदोलन केले. ‘उद्धवा अजब तुझे निष्पळ सरकार’ असा फलक त्यांनी हातामध्ये घेतला होता.

राज्य सरकारच्या विरोधात भाजपकडून राज्यभर मेरा आंगन, मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलन केले जात आहे. शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी मोरवाडीतील पक्ष कार्यालयासमोर उभे राहून आंदोलन केले.

त्यांनी दंडाला काळी फित बांधून निषेध केला. तसेच ‘उद्धवा अजब तुझे निष्पळ सरकार’ असा फलक त्यांनी हातामध्ये घेतला होता.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. महापालिकेतील भाजप नगरसेवकांनी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालये, घरातील अंगणासमोर उभे राहून आंदोलन केले.

याबाबत शहराध्यक्ष महेश लांडगे म्हणाले, कोरोनाची महामारी रोखण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे.  सरकारचे कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन केले आहे.

नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या घरासमोर उभे राहून आंदोलन केले आहे. काळे कपडे, फित बांधून सरकारचा निषेध केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.