Wakad : कोयत्याचा धाक दाखवून तरूणाला लुटले

एमपीसी न्यूज – पायी जाणार्‍या तरूणाला रिक्षातून आलेल्या चौघांनी कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील सोन्याची चैन, रोकड, मोबाईल असा 40 हजारांचा ऐवज लुटून नेला. हा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास वाकड येथे घडला.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी प्रकाश अमृत हडपत (वय 24, रा. बालाजी आर्केड, कल्याण ईस्ट) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश शुक्रवारी मध्यरात्री जेग्वार शोरूम समोरील सर्व्हिस रस्त्यावरून पायी जात होते. रिक्षातून आलेल्या चौघांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील सोन्याची चैन, रोकड, मोबाईल असा 39 हजार 500 रूपयांचा ऐवज लुटून नेला. वाकड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.