Mumbai-Pune highway; राष्ट्रीय महामार्गावर कार व कंटेनरचा भिषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज  मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ आज सकाळी कार व कंटेनर यांच्या भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी कार कार्ला फाटा सोडल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या मध्ये असणारे दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या कंटेनर खाली घुसल्याने हा भिषण अपघात झाला. यामध्ये कारमधील सर्व प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.