India Corona Update : चोवीस तासांत 2.34 लाख नवे कोरोना रुग्ण, 893 मृत्यू

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशात नव्यानं वाढ झालेल्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. चोवीस तासांत 2 लाख 34 हजार 281 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 893 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाची सद्यस्थिती जाणून घेऊया आठ मुद्यांमध्ये.

1. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्या 18.84 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

2. गेल्या 24 तासांत 3 लाख 52 हजार 784 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे..

3. ICMR च्या आकडेवारीनुसार आजवर देशात 72.73 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 16.15 लाख चाचण्या पार पडल्या.

4. देशाचा रिकव्हरी रेट 94.21 टक्के एवढा झाला आहे.

5. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 14.50 टक्के एवढा झाला आहे.

6. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम अंतर्गत 165.70 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

7. देशात आजवर 4 लाख 94 हजार 091 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

8. सध्या महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.