Wakad : डांगे चौकात पुन्हा एकदा बर्निंग कारचा थरार

एमपीसी न्यूज – शॉर्टसर्किट झाल्याने धावत्या कारने पेट घेतला. ही घटना आज, गुरुवारी (दि. 26) रात्री पावणे नऊच्या सुमारास डांगे चौकाजवळ रघुनंदन मंगल कार्यालयासमोर घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आमिर तांबोळी रात्री पावणे नऊच्या सुमारास त्यांच्या एम एच 12 / एन बी 1150 ही कारमधून तातवडे येथून औंधच्या दिशेने जात होते. त्यांच्या गाडीत एक प्रवासी होता. डांगे चौकाजवळ असलेल्या रघुनंदन मंगल कार्यालयासमोर  आल्यानंतर गाडीमध्ये शॉर्टसर्किट झाले आणि गाडीने पेट घेतला. दरम्यान, प्रसंगावधान राखत चालक आमिर तांबोळी आणि प्रवासी तात्काळ कारमधून बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच रहाटणी अग्निशमन उपविभागाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
दरम्यान, 22 डिसेंबर रोजी काळेवाडी येथे देखील अशाच प्रकारे शॉर्टसर्किट झाल्याने कार पेटल्याची घटना घडली. त्यानंतर चार दिवसांनी याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.