Eldrock Award : चैतन्य इंटरनॅशनल स्कुलचा एल्डरॉक पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज : चैतन्य इंटरनॅशनल स्कुलला यावर्षीचा ELDROK India K-12 Award 2022 या पुरस्काराने सन्मानित (Eldrock Award) करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात शिक्षणासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण कार्यपद्धती विकसित करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्तिमत्वाच्या कर्तृत्वासाठी एल्डरॉक पुरस्कार दिला जातो. दरवर्षी हा पुरस्कार काही निवडक शाळांना दिला जातो.
या वर्षी या पुरस्कारासाठी चैतन्य इंटरनॅशनल स्कूल, इंदोरी या शाळेची निवड शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमातून शाश्वत आणि समग्र विकास घडवण्यात उत्कृष्टता (Excellence in Sustainable and Holistic Growth Program) या कामगिरीसाठी देण्यात आले. विद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण व मूल्य शिक्षण देणाऱ्या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करून त्याचे योग्य सादरीकरण केल्याबद्दल निवड समितीने ही निवड केली आहे.
पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये 11 ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. या सोहळ्यास 160 विद्यालयांनी सहभाग घेतला होता. यामध्ये काही निवडक शाळांना विविध कार्यक्षेत्रात सन्मानित करण्यात आले. चैतन्य इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता खेडकर यांनी हा सन्मान स्वीकारला.
या पुरस्काराने विद्यालयाच्या शिरपेचात (Eldrock Award) आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. भगवान शेवकर यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याचे कार्य मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता खेडकर व अध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
संस्थेचे संस्थापक भगवान शेवकर यांच्या दूरदृष्टी व अथक परिश्रमातून साकार झालेल्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंदोरी व पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी इंग्रजी शिक्षणाने लाभान्वित होत आहेत. त्याबद्दल पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. दर्जेदार व कृतीशील शिक्षण पद्धतीमुळे चैतन्य इंटरनॅशनल स्कूलने आज शिक्षणक्षेत्रात मोलाचे स्थान निर्माण केले आहे.
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की यापुढेही विद्यालयात असेच नाविन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविले जातील. तसेच ही गुणवत्ता टिकवून ठेवण्याचा आणि वाढवण्याचा सतत प्रयत्न करू. तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, अध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातुन चैतन्य इंटरनॅशनल स्कूलचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.