Chaitanya International School : चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षकांसाठी समुपदेशनपर शिबिर

एमपीसी न्यूज – इंदोरी येथील चैतन्य इंटरनॅशनल (Chaitanya International School) स्कूलमध्ये शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर तथा विद्यार्थ्यांच्या अडचणी कशा जाणून घ्याव्यात, यासाठी सतीश पाटील यांचे समुपदेशनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये त्यांनी विद्यार्थी व त्यांच्या अडचणीसाठी शिक्षकाने आत्मविश्वास, निरीक्षण कार्यप्रवीणता, आत्मपरीक्षण स्व-कृती इत्यादी वर भर दिला पाहिजे. असे आपले विचार मांडले. शिक्षकांनी शिकवताना तसेच विद्यार्थ्यांना घडवताना येणाऱ्या अडचणी कोणकोणत्या आहेत? हे जाणून घेऊन प्रत्येक शिक्षकाने आपली अशी खास शैली तयार करावी. त्यासाठी स्वतःमधील कमतरता शोधून परिपूर्णता आणावी. हे त्यांनी अनेक उदाहरणाद्वारे समजावून सांगितले.

या समुपदेशन शिबिरामुळे शिक्षक व विद्यार्थी यातील संबंध किती चांगल्या प्रकारे बनवता येतील? यावरही भर देण्यात आला. या शिबिरासाठी प्रामुख्याने व्यवस्थापन समितीचे सभासद, प्राचार्य तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याने संस्थेप्रती आभार प्रकट केले.

Inter school competition Talegaon : आंतरशालेय आणि शालांतर्गत स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलची बाजी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.