Inter school competition Talegaon : आंतरशालेय आणि शालांतर्गत स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलची बाजी

एमपीसी न्यूज – स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल आणि तळेगाव शहरातील अनेक शाळांतर्फे विविध स्पर्धांचे (Inter school competition Talegaon) आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांच्यातील कला जोपासण्यासाठी मेहंदी स्पर्धा समूह, गीत गायन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा, राखी निर्मिती स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.

कै.अण्णासाहेब विजापूरकर स्मृती प्रित्यर्थ तालुकास्तरीय बौद्धिक स्पर्धेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत कु.शौर्य संतोष बन (3 री,अ) प्रथम क्रमांक; कु. सुरक्षा कटरे (8वी) द्वितीय क्रमांक; अनुष्का माधव कदम (4थी,अ) तृतीय क्रमांक; श्री गणेश तरुण मंडळ तर्फे आयोजित लोकनृत्य स्पर्धेत प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावून बहुमान मिळवला. स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मिलिंद शेलार, शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख, पर्यवेक्षिका रेणू शर्मा यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.

Wakad : वाकडमधील रिद्धी सिद्धी हाइट्स सोसायटीमध्ये रक्तदान शिबिर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.