Chakan : कंपनीबाहेर पार्क केलेली दुचाकी साडे तीन तासात चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीबाहेर पार्क केलेली दुचाकी (Chakan) भरदिवसा अवघ्या साडे तीन तासात चोरीला गेली आहे. ही चोरी नाणेकरवाडी येथील ब्रँम्बो कंपनीच्या समोर घडली आहे.

Jansanvad Sabha : अर्थसंकल्पात नागरिकांनी सूचिवलेल्या कामांसाठी तरतूद करा, जनसंवाद सभेत मागणी

सागर रघुनाथ शोवाळे (वय 23 रा. खेड) यांनी फिर्याद दिली असून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची होंडा शाईन ही दुचाकी (एम.एच.46 बी.एल 9788) ही ब्रँब्रो कंपनी समोर पार्क केली होती. मात्र, चोरट्यांनी 50 हजार रुपयांची दुचाकी चोरून नेली. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.