Chakan : खराबवाडीतील कचरा डेपोवर हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रे, तर कचरा टाकणाऱ्यावर होणार गुन्हा दाखल

बेकायदा कचरा टाकणार्यांच्या विरोधात तक्रारी

एमपीसी न्यूज : चाकण आंबेठाण रस्त्यावरील खराबवाडी हद्दीत (Chakan) टाकण्यात येणारा व जाळला जाणारा कचरा या बाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. सदर ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रे लावण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे खेड पंचायत समिती व पोलिसांना पत्रे देऊन बेकायदेशीरपणे कचरा टाकणाऱ्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चाकण पालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी या भागाची संयुक्त पाहणी केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी सांगितले कि, चाकण – आंबेठाण रस्त्यावरील खराबवाडी ग्रामपंचायत हद्दीत दगडी खाणीत चाकण व परिसरातील ग्रामपंचायतीचा कचरा टाकण्यात येतो.

तसेच, काही व्यक्ती दांडगाई करून पिंपरी चिंचवड परिसरातील घातक कचरा येथे टाकतात. टाकण्यात आलेल्या कचऱ्याला नंतर लाग लावून दिली जात आहे.

याबाबत महाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे देखील महाराष्ट्र (Chakan) प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सांगण्यात आले.

चाकण नगरपरिषद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने दगडी खाणीतील कचऱ्याची पाहणी करण्यात आली. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, चाकणचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर, चाकण पालिकेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, बिरदवडी व खराबवाडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

Chandrayan 3 : चांद्रयान 3 लँडिंग पॉईंटचे नाव आता शिवशक्ती पॉईंट – नरेंद्र मोदी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.