Chandrayan 3 : चांद्रयान 3 लँडिंग पॉईंटचे नाव आता शिवशक्ती पॉईंट – नरेंद्र मोदी

एमपीसी न्यूज – जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात भारताचे नाव (Chandrayan 3) कोरणाऱ्या चंद्रयान 3 च्या यशाची आठवण म्हणून चंद्रयान 3 जिथे लँड झाले आहे त्या पॉईंटला शिवशक्ती असे संबोधले जाईल, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले.

चंद्रयान 3 च्या यशानंतर ते आज( शनिवारी) इस्त्रो येथे शास्त्रज्ञांना शुभेच्छा देण्यासाठी गेले आहेत. यावेळी त्यांनी चंद्रयान 2 व 3 उतरले गेलेल्या जागांचे नाव जाहीर केले.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश आहे. आपण इतिहास घडवला आहे जो मी स्त्री शक्तीला समर्पित करत आहे.

त्यामुळे चंद्रयान 3 जिथे यशस्वी रित्या उतरले आहे त्या जागेला (Chandrayan 3) आजपासून शिवशक्ती म्हणून ओळखले जाईल. ती नवनिर्मितीची ऊर्जा आहे.

याबरोबरच चंद्रयान 2 ही देखील आपल्या यशाची पहिली पायरी होती म्हणून विक्रम लँडर जिथे लँड झाले त्या जागेलाही तिरंगा या जागेने ओळखले जाईल.

इथून पुढे देशातील सर्व तरुण पिढी चंद्राला बघताना आपण चंद्रावर तिरंगा फडकवला या गर्वाने पाहील.

या यशस्वी मोहिमेनंतर अंतराळ मोहिमांमध्ये तिसऱ्या रांगेत असलेला आपला देश थेट पहिल्या पाच देशांमध्ये आला आहे हे आपले खूप मोठे यश आहे. यामुळे 23 ऑगस्ट हा दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जाईल. असे ही नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले.

Ganeshostav 2023 : गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.