Chakan : शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

Both arrested for carrying weapons : अटक केलेले आरोपी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे पोलीस तपासात सामोर आले

एमपीसी न्यूज – हत्यार बाळगल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी गुन्हा करण्यासाठी जात असल्याचे दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. ही कारवाई रविवारी (दि. 26) दुपारी दोन वाजताच्या सुमारास आसखेडकडून करंजविहीरे गावाकडे जाणा-या रस्त्यावर करण्यात आली.

सागर महादू सप्रे (वय 22), विजय दादाभाऊ गावडे (वय 20, दोघेही रा. भामा आसखेड, ठाकरवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई शशिकांत होले यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच 14 / डीडी 2714) आसखेडकडून करंजविहीरे गावाकडे जात होते.

त्यांच्यासोबत कोयता आणि तलवार अशी घातक हत्यारे होती. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी दोघांवर कारवाई करत अटक केली.

त्यांच्यावर शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेले आरोपी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे पोलीस तपासात सामोर आले आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.