Chakan News : पाच देशी पिस्टल व 6 जिवंत काडतूसे जप्त

एमपीसी न्यूज –  पोलिसांनी दोन विविध प्रकरणात पाच देशी पिस्टल व 6 जिवंत काडतूसे जप्त केली आहेत.

पहिल्या प्रकरणात चाकण पोलिसांनी नितीन थिटे, (वय 25 रा. रेटवडी, ता. खेड) या आरोपीस अटक केली आहे. त्याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम  व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 जुलैला संध्याकाळी 4.40 वा चे सुमारास चाकण येथील नाशिक पुणे महामार्गालगत सर्व्हिस रोडवर नाणेकरवाडी अंडरब्रिज येथे आरोपी थिटे यांच्याकडे 1 देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडततुस बेकायदेशीररित्या मिळाली.

 

दुसऱ्या प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलिसांनी वेदांत माने, (वय 25, रा. लांडेवाडी भोसरी) या आरोपीस अटक केले आहे. त्याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27 जुलैला संध्याकाळी 4.10 वा इंद्रायणीनगर, भोसरी येथे त्याच्या ताब्यात 1 लाख रुपये किंमतीचे 4 गावठी पिस्टल व 1,200 रुपये किंमतीचे चार जिवंत राऊंड बेकायदेशीररित्या मिळाली.

 

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांचे 25 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये बंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.