Chincwad News : रविवारी प्रा. रेखा पिटके यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज –  निवृत्त प्राध्यापिका रेखा पिटके – आठवले यांच्या “काव्यारेखा” या  काव्यसंग्रहाचा प्रकाशन सभारंभ रविवारी (दि. २७) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. 

 

 

यावेळी ज्येष्ठ कवी व गझलकार प्रदीप निफाडकर, गिरीश केमकर, ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर आणि श्रीकांत चौगुले आदी उपस्थित राहणार आहेत. “काव्यरेखा” च्या या प्रकाशन सोहळ्यास आपण उपस्थित रहावे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व निमंत्रक राजेंद्र आठवले आणि रोहित आठवले यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.