Chakan News: ग्राहक महिलेने सोन्याच्या दुकानातील कामगाराची नजर चुकवून पळवले ब्रेसलेट

एमपीसी न्यूज – ग्राहक म्हणून सोन्याच्या दुकानात आलेल्या महिलेने दुकानातील कामगाराची नजर चुकवून 35 हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट चोरून नेले. ही घटना 5 नोव्हेंबर रोजी दुपारी माणिक चौक, चाकण येथे अंबिका ज्वेलर्स येथे घडली.

सुशील रामनिवास वर्मा (वय 37, रा. चाकण) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 20) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे माणिक चौक, चाकण येथे अंबिका ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दुकान आहे. 5 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास एक महिला फिर्यादी यांच्या दुकानात आली. तिने सोन्याचे ब्रेसलेट घेण्याचा बहाणा करून दुकानातील कामगाराची नजर चुकवून 35 हजारांचे ब्रेसलेट पाहण्यासाठी हातात घेऊन ते हातचलाखीने पर्समध्ये ठेऊन चोरून नेले. काही दिवसानंतर हा प्रकार निदर्शनास आल्याने 15 दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.