Chakan News: नातेवाईक महिलेवर बलात्कार प्रकरणी एकाला अटक

28 ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास पीडित महिला त्यांच्या गोठ्यात जनावरांचे शेण काढत होत्या. त्यावेळी गोठ्यात पीडित महिलेचा नातेवाईक आरोपी आला.

एमपीसी न्यूज – गोठ्यात काम करत असलेल्या एका नातेवाईक महिलेवर बलात्कार करणा-याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 28 ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास वाह्गाव येथे घडली. याबाबत 2 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 39 वर्षीय नातेवाईक आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास पीडित महिला त्यांच्या गोठ्यात जनावरांचे शेण काढत होत्या. त्यावेळी गोठ्यात पीडित महिलेचा नातेवाईक आरोपी आला. त्याने गोठ्याचे दार बंद करून पीडित महिलेवर बलात्कार केला.

त्यानंतर महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.