Chakan : आगीत लालपरी होरपळली; सर्व प्रवाशी सुखरूप

एमपीसी न्यूज : एकीकडे एसटी महामंडळ (Chakan) आर्थिक समस्यांचा सामना करत असताना दुसऱ्या बाजूला एसटीचे अपघात, एसटी बसेसला आग लागण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. चाकण तळेगाव मार्गावर मध्यरात्री एसटी महामंडळाच्या राजगुरुनगर आगाराच्या मुंबई – घोडेगाव बसला चाकण (ता. खेड ) येथील राणूबाईमळा भागात आग लागल्याची घटना घडली. द बर्निंग बसचा थरार प्रवाशांना आणि स्थानिकांना पाहण्यास मिळाला. चालक- वाहकांच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवाशी बसमधून सुखरूप उतरल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

शॉर्ट सर्किटमुळेमुळे बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्री बारा ते बुधवारी (दि. 22) पहाटे दोनच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

Pune : लसीकरणादरम्यान श्वानाचा मृत्यू; डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल

राणूबाईमळा येथील स्थानिक आणि आणि एसटी बसचे चालक आणि वाहक यांनी बसला आग लागल्याचे लक्षात येताच (Chakan) प्रवाशांना सुखरूप बस मधून खाली उतरवून परिसरातून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र संपूर्ण एसटी आगीत जळाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

नादुरुस्त बसेस, यांत्रिकी विभागाचे दुर्लक्ष आणि नव्या बसेस दाखल होण्यास विलंब यामुळे एसटी अपघात, एसटी बसेसना आग लागण्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. सर्वसामान्यांची लालपरी मागील काही महिन्यांपासून आगीच्या घटनांनी होरपळून निघत असून, प्रशासनाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचा आरोप प्रवाशी करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.