Pune : लसीकरणादरम्यान श्वानाचा मृत्यू; डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यातील चतु:र्श्रुंगी पोलीस (Pune) स्टेशनच्या हद्दीतून एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे.  एका श्वानाला लस  देत असताना त्याच्या गळ्याभोवती पट्टा आवळला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. श्वानाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी डॉक्टरसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 35 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

डॉ. संजीव राजाध्यक्ष (वय 60), डॉ. शुभम राजपुत (वय 35) आणि त्यांचे दोन सहाय्यक कर्मचारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पाषाण येथील विगल्स माय पेट क्लिनिकमध्ये 17 नोव्हेबर रोजी घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेकडे लॅब्रोडोर जातीचा श्वान होता. दरवर्षी या श्वानाचे लसीकरण करणे गरजेचे असते. त्यानुसार फिर्यादी 17 नोव्हेंबर रोजी आपल्या श्वानाला घेऊन विगल्स माय पेट क्लिनिकमध्ये गेल्या होत्या.

Talegaon Dabhade : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री डोळसनाथ महाराज मंदिरात रविवारी दीपोत्सव

डॉ. राजपुत आणि त्यांचे दोघे सहायक श्वानाला पट्ट्याने झाडाला बांधण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र राजपुत यांनी लावलेला (Pune) त्यांच्याकडील पट्टा हा त्याच्या गळ्याला घट्ट बसून त्याला फास बसला. त्यामुळे श्वान खाली कोसळला.

दरम्यान श्वान अचानक खाली कोसळल्याने त्याला उपचारासाठी क्लिनिकमध्ये नेण्यात आले. मात्र पंधरा मिनिटांनी श्वानाचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर दोन्ही डॉक्टर श्वानाच्या मृत्यूबाबत फिर्यादींना काही न बोलता तेथून निघून गेले. त्यानंतर फिर्यादी यांनी मात्र पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. चतु:र्श्रुंगी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.