Pune Crime : आई-वडिलांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; मुलगा आणि सुनेविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज : पुण्यातील उच्चभ्रू परिसरात ज्येष्ठ आई-वडिलांनाच मुलाने (Pune Crime) आणि सुनेने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाण्याचा नळ चालू ठेवल्याने ते पाणी आई-वडिलांच्या फ्लॅटमध्ये शिरले. त्याबाबत त्यांनी मुलाला माहिती दिली असता त्यांना शिवीगाळ करून धमकावण्यात आले आहे.

या प्रकरणी मुलगा आलोक व त्याची पत्नी यांच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 62 वर्षीय वडिलांनी तक्रार दिली आहे.

Pune : पुणे महापालिकेसमोर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू

हा प्रकार 24 जानेवारी रोजी घडला असून, पोलिसांकडे ज्येष्ठ नागरिकांनी तक्रार देताच गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांकडून तपास केला जात आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिक पांडवनगर भागात राहण्यास आहेत.

त्यांच्या वरच्या रुममध्ये मुलगा व त्याची पत्नी राहते. त्यांच्याकडून पाण्याचा नळ सुरू राहिला होता. त्यामुळे पाणी आई-वडिलांच्या रूममध्ये आले. ही बाब वडिलांनी मुलाला सांगितली.

ते समजावून सांगत होते. पण, मुलाने त्यांना शिवीगाळ (Pune Crime) केली. तर, आईला देखील अश्लील भाषेत शिवीगाळ केली. मुलाच्या पत्नीने देखील त्यांना अश्लील भाषेत बोलत त्यांच्या मुलीला व जावई यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.