Chakan Traffic News : खालुंब्रे परिसरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – चाकण वाहतूक विभागात काही तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आले आहेत. नागरिकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम आदेश दिले जाणार आहेत. खालुंब्रे येथे एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.

चाकण वाहतूक विभागाच्या हद्दीतील खालुंब्रे या ठिकाणावरुन सावरदरी, वासुली व भांबोली या ठिकाणी कंपन्यामध्ये जाणा-या व येणा-या बसेस व इतर वाहनांची संख्या अधिक आहे. तर खालुंब्रे ते हुंडाई सर्कल या दरम्यानचा रस्ता लहान असल्याने त्या रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली आहे.

येथील कोंडीतील वाहनांचा फ्लो हा चाकण-तळेगाव रस्ता असल्याने खालुंब्रे या ठिकाणी वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खालुंब्रे ते हुंडाई सर्कल अशी एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.

जाण्याचा मार्ग – खालुंब्रे ते हुंडाई सर्कल (एकूण 1.4 किलोमीटर)
येण्याचा मार्ग – हुंडाई सर्कल – एच पी चौक – चाकण तळेगाव राज्यमार्ग ((एकूण 2.5 किलोमीटर)

नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्या 10 मार्च ते 24 मार्च 2021 या कालावधीत पोलीस उपायुक्त (वाहतूक) कार्यालयात सादर कराव्यात. त्यावर विचार करून अंतिम आदेश देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.