Charholi fraud : हॉटेलची ऑफर लिंक ओपन करणे पडले दोन लाखांना

एमपीसी न्यूज : हॉटेल मधून बोलत असल्याचे सांगून ऑफर देण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून त्याआधारे क्रेडिट कार्ड मधून दोन लाख रुपये काढून घेत फसवणूक केली आहे.(Charholi fraud) ही घटना 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी चऱ्होली बुद्रुक येथे घडली.

धीरज कुमार जैन (वय 42 रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shrirang Barne : सुधारित विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला गती द्या – श्रीरंग बारणे  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला अज्ञाताने फोन करून तो सुकांता थाळी येथून बोलत असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला (Charholi fraud)फिर्यादीला ऑफर देण्याच्या बहाण्याने त्यांना एक लिंक पाठवून त्याआधारे फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्डमधून दोन लाख तीन हजार 95 रुपये काढून घेत फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.