Abdul Sattar : शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची निवड; शिंदे गटाचा निर्णय

एमपीसी न्यूज : राज्यातील सत्तासंघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वीच शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Abdul Sattar) शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. विशेष म्हणजे 40 आमदार आणि 16 शिवसेना खासदारांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या ठरावात हा निर्णय घेण्यात आल्याचं सत्तार म्हणाले आहे.

Shrirang Barne : सुधारित विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला गती द्या – श्रीरंग बारणे  

गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गटाकडून शिवसेना प्रमुख कोण असणार याबाबत चर्चा सुरू होती. मात्र याबाबत आज पहिल्यांदाच शिंदे गटाकडून खुलासा करण्यात आला आहे. सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू असताना न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात शिंदे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे.(Abdul Sattar) याबाबत आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतलेल्या ठरावात हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शिंदे गटाचे सर्व खासदार, आमदार जिल्हाप्रमुख आणि पदअधिकाऱ्यांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचंही सत्तार म्हणाले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.