Moshi News : छटपूजा समारोप ! पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या उपस्थितीत गंगा आरती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील इंद्रायणी नदीच्या तीरावर छटपूजेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवारी (दि.11) छटपुजा महोत्सवाचा समारोप संपन्न झाला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या उपस्थितीत गंगा आरती पार पडली. महाआरतीसह आयुक्तांच्या हस्ते इंद्रायणी नदीपूजन करण्यात आले.

प्रशासनाच्या वतीने छट पूजेवर निर्बंध लादल्याने अतिशय मर्यादित स्वरूपात उत्तर भारतीय बांधवांनी इंद्रायणी नदीच्या काठावर छटपूजा उत्सव साजरी केली. यावेळी इंद्रायणी नदीपात्रात उभे राहून उत्तर भारतीय बांधवांनी मावळत्या सूर्याला अर्ग वाहिले, त्यानंतर गंगा आरती प्रमाणे इंद्रायणी नदीची देखील दिव्यांच्या आरसाने ओवाळून आरती करण्यात आली.

विश्व श्रीराम सेनेच्या वतीने या महोत्सवात यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून धार्मिक विधी करण्यात आले. विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी उपस्थितांचे स्वागत केले. काशी बनारस येथून आलेल्या पौरोहित्यांनी ही महागंगा आरती केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.