Pune news: आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणी मोठी कारवाई, मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज: राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लातूरचा आरोग्यसेवा कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे यांना अटक करण्यात आली. बडगिरेनी पेपर कसा आणि कुठून मिळवला याचा तपास पोलीस करत आहेत.

आरोग्य विभागाचा पेपर फुटल्याचे धागेदोरे आता राज्याच्या आरोग्य विभागापर्यंत पोहोचते आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी एका निवृत्त जवानाला आणि मुंबई डॉकयार्डमधील एका खलाशाला या प्रकरणात अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेपर देण्याच्या मोबदल्यात एका उमेदवाराकडून सहा ते सात लाख रुपये घेण्याचे ठरले होते. त्यातील पन्नास हजार रुपये आरोपींना मिळणार होते. आणि बाकीची रक्कम त्यांना इतरांना द्यावी लागणार होती. उमेदवारांनी अद्याप पैसे दिले नव्हते. मात्र यादीत नाव आल्यानंतर त्यांना पैसे द्यावे लागणार होते. त्यासाठी आरोपींनी उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्र ठेवून घेतली असल्याचेही समोर आले आहे.

या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत विजय प्रल्हाद मुऱ्हाडे, अनिल दगडू गायकवाड, बबन बाजीराव मुंडे, सुरेश रमेश जगताप, संदीप शामराव भुतेकर प्रकाश दिगंबर मिसाळ, उद्धव प्रल्हाद नागरगोजे, प्रशांत व्यंकटराव बडगिरे, संदीप त्रिंबकराव जोगदंड, श्याम महादू म्हस्के आणि राजेंद्र पांडुरंग सानप या आरोपींना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.