Pune News:राज्यातील 56 प्राणी संग्रहालय मधील तब्बल 200 प्राण्यांचा मृत्यू , पुण्यातील राजीव गांधी संग्रहालय तिसऱ्या क्रमांकावर

एमपीसी न्यूज : प्राणीसंग्रालय मध्ये वन्यप्राण्यांना नैसर्गिक अधिवास पेक्षाही अधिक उत्तम वातावरणामध्ये ठेवण्यात येत असल्याचा दावा नेहमीच प्रशासनाकडून करण्यात येत. मात्र असं असलं तरी प्राणी संग्रहालय मध्ये वन्य प्राण्यांचे दगावण्याचे प्रमाण अधिक असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रातील 56 प्राणी संग्रहालय मधील तब्बल 200 प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालय चा तिसरा क्रमांक आहे.

2019 /2020 सेंट्रल झू अथोरिटीचा अहवाल

देशात 513 तर महाराष्ट्राचा 56 प्राणिसंग्रहालय आहेत. या प्राणी संग्रहालया मध्ये हजारो प्राण्यांचा आदिवास आहे. या प्राणीसंग्रालय यांच्या व्यवस्थेबाबत चा अहवाल दरवर्षी सादर करण्यात येतो. च्या वतीने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. अथोरिटी च्या वतीने 2019 /2020 चा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालांमधून महाराष्ट्रातील संग्रहालयाचे वास्तव समोर आले आहे.

राणीच्या बागेत सर्वाधिक प्राण्यांचे मृत्यू

या अहवालानुसार मुंबई येथील जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीची बाग या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक 67 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ वर्ध्यातील पीपल्स फॉर ॲनिमल या प्राणी संग्रहालयाचा नंबर आहे. या ठिकाणी 53 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. तर तिसर्‍या क्रमांकावर पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे. राजीव गांधी प्राणीसंग्रहालय मध्ये गेल्या वर्षभरात 35 प्राणी प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

सर्वाधिक मृत्यू हरणांचे

या अहवालानुसार सर्वाधिक मृत्यू हे हरणांचे झाल्याचे समोर आले आहे. आणि या हरणांच्या मृत्यूला हृदय विकाराचा झटका कारणीभूत असल्याचं देखील नमूद करण्यात आले आहे. हरण हा भित्रा प्राणी असल्यामुळे त्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू होत असल्याचं देखील सांगितले जात आहे. त्याचबरोबर प्राण्यांचे वय त्यांना झालेल्या जखमा आणि त्यावर ती झालेला जिवाणूंचा संसर्ग हा देखील प्राण्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

मार्गदर्शक सूचनांचा वापर करून प्राण्यांची देखभाल

सेंट्रल झू अथोरिटीने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा वापर करून प्राण्यांची देखभाल प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाकडून करण्यात येते. त्यांचे आहाराचे व्यवस्थापन करून त्यांना पोस्टीक आहार देणे. त्याचबरोबर आवश्यक त्या प्रमाणात हवा त्यांचे लसीकरण करणे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची वारंवार तपासणी करणे. याप्रकारची सर्व काळजी प्राणीसंग्रालय व्यवस्थापनाकडून करण्यात येत असल्याची माहिती राजीव गांधी प्राणीसंग्रहालय संचालक राजकुमार जाधव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.