Chief Justice Of India : एन. व्ही रमण्णा यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज – न्यायाधीश एन. व्ही रमण्णा यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची नियुक्ती केली असून, रमण्णा 24 एप्रिलला आपल्या पदाची शपथ घेतील. न्या. रमण्णा यांचा कार्यकाल 26 ऑगस्ट 2022 पर्यंत असेल.

देशाचे विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ 23 एप्रिल रोजी पूर्ण होत आहे. बोबडे यांनी एन. व्ही रमण्णा यांच्या नावाची शिफारस सरकारकडे केली होती. ते देशाचे 48 वे सरन्यायाधीश असतील.

न्या. रमण्णा यांचा जन्म 27 ऑगस्ट 1957 साली आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पोत्रावरम या खेड्यात झाला. 10 फेब्रुवारी 1983 साली न्या. रमण्णा यांनी वकिली सुरु केली. पुढे 27 जून 2000मध्ये त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी 10 मार्च 2013 ते 20 मे 2013 एवढा काळ काम पाहिले. पुढे 2 सप्टेंबर 2013मध्ये त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले. 17 फेब्रुवारी 2017मध्ये ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्त झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.