Mumbai News : पंचवीस वर्षांवरील सर्वांना लस द्यावी ; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

एमपीसी न्यूज – तरुणांना कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग होत आहे. त्यांना संसर्गापासून वाचविणे आवश्यक आहे, त्यामुळे पंचवीस वर्षांपुढील सर्वांना प्रतिबंधात्मक लस देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे. पत्रात त्यांनी ‘ब्रेक दि चेन’च्या माध्यमातून उचलेल्या पावलांचीही माहिती दिली.

राज्यातील सर्वाधिक प्रभावित 6 जिल्ह्यांसाठी दीड कोटी रुपये लसींची मागणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात केली आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने जादा डोस द्यावेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सर्वाधिक संसर्ग असलेल्या सहा जिल्ह्यांसाठी केवळ तीन आठवड्यात 45 वर्षापुढील सर्वांना लस देण्याची आमची तयारी आहे. याकरिता दीड कोटी डोस मिळावेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

प्रत्येक कोरोना रुग्ण बरा झाला पाहिजे या निर्धाराने आम्ही उपाययोजना करीत आहोत. अधिक हानिकारक होत असलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आम्ही ‘ब्रेक दि चेन’च्या माध्यमातून कडक निर्बंध लादले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या लसीकरणाची देखील माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.