Chikhali: कुदळवाडीतील रस्त्यांवर स्ट्रीटलाईट बसविण्यास टाळाटाळ

भाजयुमोचे सोशल मीडिया शहर उपाध्यक्ष दीपक गुप्ता यांचा आरोप

एमपीसी न्यूज – चिखली कुदळवाडी येथील स्वामी समर्थ कॉलनीत अंधा-या रस्त्यावर स्ट्रीटलाईट बसविण्याबाबत महिन्याभरापासून मागणी करत आहे. परंतु, विद्युत विभागातील अधिका-यांकडून स्ट्रीटलाईट बसविण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप भाजपचे सोशल मिडीया उपाध्यक्ष दीपक गुप्ता यांनी केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील चिखली, कुदळवाडीतील अंधा-या रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी आहे. मागील महिन्याभरापासून कुदळवाडीतील स्वामी समर्थ कॉलनी येथे नवीन स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी करत आहे. संबंधित अधिका-यांनी लाईट लावून देण्याचे आश्वासन दिले. परंतु, प्रत्यक्षात काम केले जात नाही. वरिष्ठ अधिका-यांकडून काम करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.

अधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत. अधिका-यांमुळे नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे. नागरिकांना रात्री-अपरात्री जाताना अंधारातून जावे लागते. त्यामुळे त्रास होत आहे. विद्युत विभाग अजून किती दिवस नागरिकांना अंधारात ठेवणार आहे? असा सवालही गुप्ता यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.