Pimpri : पिंपरीत दोन ठिकाणी घरफोडी; अडीच लाखांचे सोने लंपास

एमपीसी न्यूज – पिंपरी परिसरात दोन ठिकाणी घरफोडीचे गुन्हे घडले आहेत. अजमेरा कॉलनी आणि संत तुकाराम नगर येथे घडलेल्या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण 2 लाख 50 हजार 730 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली आहे.

पहिल्या घटनेत नरेश अशोक साळी (वय 37, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 4 डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते 5 नोव्हेंबर रोजी पहाटे पावणेसहा या कालावधीत नरेश यांचे घर बंद होते. अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून 56.1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे पैंजण असा एकूण 59 हार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

दुस-या घटनेत प्रकाश नरसिंग दाभाडे (वय 64, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. 7) दुपारी सव्वाचार ते पावणेपाच वाजण्याच्या दरम्यान आरोपींनी प्रकाश यांच्या घरात बेडरूममध्ये अज्ञात चोरट्याचे प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सहा तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 91 हजार 230 रुपयांचा ऐवज चोरून नेला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.