Chikhali: मित्राच्या घरात घुसून मारहाण, तोडफोड; गुन्हा दाखल

Chikhali: Beating a friend vandalism house; Filed a crime त्यानंतर भीमजीत यांच्या घरात घुसून त्यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर घराच्या खिडकीची काच फोडली.

एमपीसी न्यूज- मित्राच्या घरात घुसून दोघांना मारहाण केली. तसेच घराच्या खिडकीची काच आणि दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. याबाबत तोडफोड करणाऱ्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 13) रात्री साडेअकरा वाजता तळवडे येथील सहयोगनगर येथे घडली.

भीमजीत नागेश राऊत (वय 27, रा. सहयोगनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी देवानंद भीमाशंकर जमादार (वय 33, रा. दत्तनगर, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भीमजीत आणि आरोपी देवानंद हे दोघे मित्र आहेत. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता देवानंद याने भीमजीत यांना फोन करून शिवीगाळ केली.

त्यानंतर भीमजीत यांच्या घरात घुसून त्यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर घराच्या खिडकीची काच फोडली.

घरातून जाताना भीमजीत यांचा लहान भाऊ दत्त नागेश राऊत यालाही हाताने मारहाण केली.

घराच्या बाहेर पार्क केलेली मोपेड दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.