Chikhali crime News: बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेतल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेने खरेदी केलेल्या जागेचा तिघांनी मिळून बेकायदेशीरपणे ताबा घेऊन वहिवाटदार महिलेला जागेत येण्यास मज्जाव केला. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 ते 28 ऑक्टोबर रोजी सहयोगनगर, तळवडे येथे घडली.

जुबेर सय्यद (रा. तळवडे), समीर शेख, मेहबूब शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत रेश्मा विजय लोखंडे (वय 33, रा. मोशी) यांनी शुक्रवारी (दि. 30) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोखंडे यांनी सहयोगनगर, तळवडे येथे गट क्रमांक 167 मधील 13 हजार 566 चौरस फुट जागा खरेदी केली आहे. त्या जागेच्या कायदेशीर वहिवाटदार लोखंडे या आहेत.

असे असताना आरोपींनी त्यांच्या जागेत बेकायदेशीरपणे प्रवेश केला. जागेवर ताबा घेत पत्रे लाऊन लोखंडे यांना त्यांच्या जागेत येण्या-जाण्यासाठी प्रतिबंध केला. तसेच त्या प्लॉटवर न येण्याची लोखंडे यांना आरोपींनी धमकी दिली.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.