Pimpri corona Update : आशादायक ! कोरोनामुळे आज एकही मृत्यू नाही

शहरात 166 नवीन रुग्ण, 232 जण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 146 आणि पालिका हद्दीबाहेरील 20 अशा 166 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 87 हजार 740 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 232 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील एकाचाही आज कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. गेल्या अनेक दिवसानंतर आज पहिल्यांदाच एकही मृत्यू झाला नाही, हे आशादायक चित्र आहे. महापालिका हद्दीबाहेरील 2 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात जुन्नर येथील 67, 67 वर्षीय दोन पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 87 हजार 740 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 84 हजार 478 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1527 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 632 अशा 2159 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 859 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1269 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.