Chikhali crime News : पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – विनापरवाना गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 2) रात्री पावणे बारा वाजता भीमशक्ती नगर झोपडपट्टी, चिखली येथे घडली.

किरण महादेव बनसोडे (वय 32, रा. भीमशक्ती नगर झोपडपट्टी, मोरेवस्ती, चिखली), जयभीम भिका भालेराव (वय 26, रा. भीमशक्ती नगर झोपडपट्टी, मोरेवस्ती, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलीस शिपाई संतोष बिभीषण सपकाळ यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 2) रात्री पावणे बारा वाजता दोघेजण मोरेवस्ती, चिखली येथील भीमशक्ती नगर झोपडपट्टी येथे पिस्टल घेऊन आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून किरण आणि जयभीम या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 40 हजारांचे एक गावठी पिस्टल आणि एक हजार 500 रुपयांची तीन जिवंत काडतुसे मिळाली.

पोलिसांनी शस्त्र जप्त करून त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.