Chikhali : मारहाण, छळप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज  – पत्नी दिसायला सुंदर नसल्याने पतीने तिला वारंवार मारहाण करून तसेच मानसिक त्रास देऊन छळ केला. ही घटना जाधववाडी चिखली येथे घडली.

याप्रकरणी तीन वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सचिन नरेश कुमार (वय 43, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेली आरोपी पतीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन याचे पहिले लग्न झाले असताना देखील ही बाब माहिती न होऊ देता आरोपीने फिर्यादी यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर काही दिवसांनी स्वयंपाक न येणे तसेच शुल्लक कारणांवरून सचिन फिर्यादी यांना मारहाण करून लागला. ‘तू दिसायला चांगली नाही, त्यामुळे मला माझे मित्र चिडवतात’ असे म्हणून सचिन फिर्यादी महिलेला शिवीगाळ आणि मारहाण करत होता.

फिर्यादी यांच्याशी न बोलता आरोपी त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.