_MPC_DIR_MPU_III

Chikhali News : बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त त्रिवेणीनगर येथे शनिवारी रक्तदान शिबीर

एमपीसीन्यूज : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना प्रणीत महाराष्ट्र वितरक सेनेच्यावतीने त्रिवेणीनगर- हनुमान मंदिर येथे शनिवारी ( दि. 23) सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_IV

शिबिराचे मुख्य आयोजक, महाराष्ट्र वितरक सेनेचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष रावसाहेब थोरात आणि वैभव छाजेड यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र वितरक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मारुती साळुंखे व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर होत आहे.

कोरोना संकटामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात रक्ताची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार येत्या शनिवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्रिवेणीनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

चिखली, मोरे मस्ती, रुपीनगर, सोनवणे वस्ती, म्हेत्रे वस्ती, ताम्हाणे वस्ती आदी परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रावसाहेब थोरात आणि वैभव छाजेड यांनी केले आहे.

शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रभाकर कळमकर, बापू देशमुख, धोंडिबा काळे, केशव रेड्डी, ज्ञानेश्वर काळे, देवीदास यादव, संदीप आखाडे, विशाल बांदल, चेतन सावंत, कुलदीप कोठावळे, तानाजी गायकवाड, संतोष गावडे, सचिन चव्हाण, वैभव थोरात, अवधूत जाधवआदी प्रयत्न करीत आहेत.

तसेच महाराष्ट्र वितरक सेनेचे पदाधिकारी गणेश आहेर, गोविंद बालघरे, बाळासाहेब नाखाडे, महेंद्रसिंह शेखावत यांनी शिबिराच्या संयोजनात पुढाकार घेतला आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.