Chikhali News : हभप नामदेव विष्णू यादव यांचे निधन

एमपीसीन्यूज : चिखली, कुदळवाडी येथील वारकरी सांप्रदायातील हभप नामदेव विष्णू यादव यांचे वृद्धापकाळाने रविवारी ( दि. 31) निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.

त्यांच्यामागे दोन मुली, दोन मुले, नातवंडे असा मोठा परिवार होता. शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांचे ते थोरले सासरे आणि उद्योजक बाळासाहेब विष्णू यादव यांचे ते थोरले बंधू होत. स्वीकृत सदस्य दिनेश यादव आणि शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव यांचे ते चुलते होत.

_MPC_DIR_MPU_II

चिखली गावातील टाळ मंदिर आणि विठ्ठल रखुमाई मंदिर उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते.

नियमित वारी करणारे, हरिपाठ, कीर्तन आदी वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेणारे जेष्ठ वारकरी हरपले, अशी हळहळ कुदळवाडी चिखली ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.