Chikhali News : पिंपरी चिंचवड शहराची ‘संतपीठ’ अशी नवी ओळख होईल : महापौर उषा ढोरे

जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे ऑनलाईन उद्घाटन

एमपीसी न्यूज – जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये संतपीठ सुरू होत आहे. अध्यात्म आणि आधुनिक शिक्षण प्रणालीसह ‘सीबीएसई’च्या माध्यमातून शहराची संतपीठ अशी नवी ओळख निर्माण होईल, असा विश्वास महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केला.

टाळगाव चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे शुक्रवारी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी फ- प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, संतपीठाच्या संचालिका प्रा. स्वाती मुळे, महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे आदी उपस्थित होते. तसेच, भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी संतपीठ ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यात सहभाग दर्शवला.

शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवडला वारकरी सांप्रदायाचा वैभवशाली वारसा लाभला आहे. संतपीठाच्या माध्यमातून या वारशाचे जतन होईल, अशी अपेक्षा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.