Hinjawadi Crime News : गोडाऊनचे शटर उचकटून 11 लाख 69 हजारांच्या सिगारेट चोरल्या

एमपीसी न्यूज – गोडाऊनचे शटर उचकटून चोरट्यांनी अकरा लाख 69 हजार 41 रुपये किमतीच्या सिगारेट चोरून नेल्या. ही घटना मंगळवारी (दि. 20) मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास सरकार चौक मारूंजी येथे घडली.

रोशन रमेश वाधवाणी (वय 40, रा. पिंपरी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार चौक, मारुंजी येथे बॉम्बे एजन्सीचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये फिर्यादी रोशन वाधवाणी मॅनेजर म्हणून काम करतात. 20 जुलै रोजी मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी बॉम्बे एजन्सीच्या गोडाऊनचे शटर उचकटून आत प्रवेश केला. गोडावूनमधून 11 लाख 69 हजार 41 रुपये किमतीचा विविध कंपनीचा सिगारेटचा माल चोरट्यांनी चोरून नेला.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.