Chikhali News: प्राधिकरणातील विशेष नियोजन कार्यालयाचे चिखलीत स्थलांतर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विशेष नियोजन प्राधिकरण कार्यालयाचे चिखली येथे स्थलांतर झाल्याची माहिती भूमि आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी दिली.

विशेष नियोजन प्राधिकरण कक्ष यापूर्वी आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील पूर्वीच्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये सुरु होते.  आता या कार्यालयाचे स्थलांतर झाले आहे.

चिखली जाधववाडी येथील राजे शिवाजीनगर, चिखली प्रभाग क्रमांक 2, सेक्टर क्रमांक 16 येथील सावतामाळी उद्यानातील व्यायामशाळा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर विशेष नियोजन प्राधिकरण कक्षाचे कामकाज चालणार आहे.  सर्व अर्जदार आणि नागरिकांनी याबाबतची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त जोशी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.