Talegaon News : लग्नात हुंडा न दिल्याने पत्नीला पाठवला तलाकनामा, नंतर केला विनयभंग

एमपीसी न्यूज – लग्नात हुंडा व मानपान न दिल्याने पत्नीला तलाकनामा पाठवला आणि त्यानंतर महिला घरात एकटी असताना तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पतीसह माहेरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25-12-2017 ते 01-06-2018 तसेच 10-10-2018 य दरम्यान तळेगाव दाभाडे, ता. मावळ येथे ही घटना घडली आहे.

याप्रकरणी गुरूवारी (दि.17) दिघी पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासु-सासरे, दिर, जाव, नणंद (सर्व रा. माळवाडी, तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात भारतीय भारतीय दंड विधान कलम 498 (अ), 354,323, 504, 34 मुस्लीम वुमन प्रोटेक्शन ऑफ राईट ऑन मॅरेज कायदा 2019 कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात हुंडा म्हणून सोन्याचे दागिने दिले नाहीत तसेच मानपान केला नाही. म्हणून फिर्यादी महिलेला वारंवार टोचून बोलने आणि शिवीगाळ करून शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच आरोपी पतीने तीन वेळा तलाक नामा पाठवला. त्यानंतर मार्च 2018 मध्ये फिर्यादी महिला घरात एकट्या असताना आरोपीने त्यांचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.