Chikhali : ग्राहकांच्या सेवेसाठी चिखली नेवाळे वस्ती येथे ‘Strong Wings Honda’चे अधिकृत सेवा केंद्र सुरू

एमपीसी न्यूज – ग्राहकांच्या सोयीसाठी ‘Strong Wings Honda’ने चिखलीतील नेवाळे वस्ती येथे नुकतेच नवीन (Chikhali) सेवा केंद्राचे उद्दघाटन केले. हे उद्द्घाटन सेवा केंद्राचे झोनल प्रभारी, एम. कार्तिक व क्षेत्र व्यवस्थापक प्रमोद शेंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी स्ट्राँग विंगच्या संचालिका दिलशाद थानावाला  व  इलिशा थानावाला उपस्थित होत्या.

या सेवा केंद्रामुळे चिखलीकरांना होंडाच्या दुचाकी देखभाल व दुरुस्ती करणे अधिक सोपे झाले आहे. या सेवा केंद्रावर ग्राहकांना अस्सल सुटे भाग, तेल आणि वंगण, होंडा प्रशिक्षित मनुष्यबळ, जलद व सुलभ सेवा आणि गाडी वॉशिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

यामुळे ग्राहकांना होंडाद्वारे पारदर्शक आणि ग्राहक केंद्रीत सेवा अनुभवण्यास मदत होईल. तेल फिल्टर बदलणे, एअर फिल्टर रिप्लेसमेंट, कार्बोरेटर साफ करणे, इंजिन ट्यूनिंग हेडलाइट फोकस, मागील आणि समोर ब्रेक समायोजन, स्पार्क प्लग बदलणे सर्व नट आणि बोल्ट घट्ट करणे, चेन स्प्रे, क्लच प्ले ऍडजस्टमेंट, बाईक वॉश, ब्रेक लाइनर बदलणे, डिस्क तेल बदलणे, पेट्रोल टाकी साफ करणे, बॅटरी चार्जिंग आदी सेवा मिळणार आहेत.

 

याबरोबरच रांका ज्वेलर्स शेजारी पिंपरी आणि केएसबी चौक हॅाटेल भोला शेजारी  चिंचवड अशी दोन शोरुमच्या माध्यमातून होंडाच्या सर्व प्रकारच्या दुचाकींची विक्री होत असते. केएसबी चौकातील शोरुममध्ये दुचाकींची विक्री व देखभाल दुरुस्तीचे काम केले जाते. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी एक नवीन अत्याधुनिक सर्विस सेंटर चिखली येथे सुरु केले आहे.

Honda Activa 6G, Honda CB Shine,Honda SP 125,Honda Dio, Honda CD 110 Dream,Honda Livo,Honda Hornet 2.0,Honda Shine 100,dio 125, sp 160, Activa 125 & Cb 200x अशा सर्व बाईकची विक्री व सर्व्हिस आता पिंपरी चिंचवडकरांना अगदी हाकेच्या अंतरावर मिळणार (Chikhali) आहे.

होंडा गाडीची काहीही तक्रार असेल तर चिखलीच्या ‘Strong Wings Honda’च्या अधिकृत सेवा केंद्राला भेट द्या आणि निश्चिंत होऊन जा. कारण गाडीची दुरुस्ती व सेवेची शंभर टक्के खात्री हाच विश्वास घेऊन होंडा गेल्या 2021 सालापासून ग्राहकांना सेवा देत आहे.

ग्राहकांच्या याच विश्वासावर होंडा दरवर्षी 1.65 मिलीयन दुचाकींची निर्मिती करते. यामध्ये 3 क्रुझर बाईक, 6 कम्यूटर बाईक, 8 स्पोर्ट्स बाईक, 4 स्कूटर बाईक, 2 ऑफ रोड बाईक अशा मॉडेलचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.