Chikhali : कडीकोयंडा उचकटून भरदिवसा सुमारे तीन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – भरदिवसा दुपारी एक ते अडीचच्या सुमारास कृष्णानगर चिंचवड येथे घरफोडी झाली. कुलूप लावून बंद असलेल्या घराच्या दरवाजाचा चोरट्यांनी घरात प्रवेश करत तीन लाख नऊ हजारांचे 11 तोळे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 9) घडली.

विष्णू ज्ञानदेव बोरोले (वय 52, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बोरोले यांचे घर गुरुवारी दुपारी कुलूप लावून बंद होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा कशाच्या तरी साह्याने उचकटून घरात प्रवेश केला. 11 तोळे सोने व चांदीचे तीन लाख नऊ हजारांचे दागिने चोरट्यांनी घरातून चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.