Bhosari : रिक्षा लावण्याच्या कारणावरून दोघांना लोखंडी रॉडने मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रिक्षा लावण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लोखंडी रॉड आणि विटांनी मारहाण करत दोघांना जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 9) सकाळी साडेअकराच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी येथे घडली.

राजू व्यंकट चांदणे (वय 27, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिंसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चांदणे आणि आरोपी यांच्यात रिक्षा लावण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपी यांनी फिर्यादी यांना व सागर जाधव यांना शिवीगाळ केली. तसेच हाताने, लोखंडी रॉड आणि विटांनी मारहाण केली. यात फिर्यादी व सागर जाधव हे दोघे जखमी झाले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.