Chikhali Theft News : ऑफिस फोडून चोरट्यांनी पळवले तीन लाख

एमपीसी न्यूज – रियल इस्टेट खरेदी विक्रीचे ऑफिस फोडून चोरट्यांनी तीन लाख 15 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 5) सकाळी अंगणवाडी चौक, चिखली (Chikhali Theft News) येथे उघडकीस आली.

शिवलिंग वसंत जरे (वय 40 , रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चिखलीमधील (Chikhali Theft News) अंगणवाडी चौकात रियल इस्टेट खरेदी विक्रीचे ऑफिस आहे. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता त्यांनी ऑफिस कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी ऑफिसचे शटर उचकटून आत प्रवेश केला. पाच तोळे वजनाचा सोन्याची गणपती मूर्ती, अर्धा किलो चांदीचे दोन हत्ती, सर्वरचे हार्डडिस्क, सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर, रोख रक्कम, बँकेची आणि खरेदी विक्रीची महत्वाची कागदपत्रे असा एकूण तीन लाख 15 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार शनिवारी सकाळी सात वाजता उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Kharalwadi Pimpri : जमीनीच्या व्यवहारात साडेसात लाखांची फसवणूक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.